जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधानांची सैनिकांसोबत दिवाळी

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. वास्तविक पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचले होते. तेथील जवानांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सैनिकांना संबोधित करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदींचा ताफा लाल दिव्याशिवाय दिल्लीहून निघाला होता. कोणत्याही विशेष सुरक्षेशिवाय ते येथून गेले होते. पीएम मोदींची गाडीही ट्रॅफिक सिग्नलवर थांबली. पंतप्रधान तिथल्या फॉरवर्ड पोस्टलाही भेट देतील. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, दीपावलीच्या या संध्याकाळी तुमच्या शौर्याच्या, वीरतेच्या, पराक्रमाच्या, त्याग आणि तपश्चर्येच्या नावाने, त्या दिव्याच्या प्रकाशात भारतातील प्रत्येक नागरिक तुम्हाला अनेक शुभेच्छा देत राहील.

यावेळी ते म्हणाले की, “आज मी पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे. आज पुन्हा मी तुम्हाला नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवा विश्वास घेऊन आलो आहे. मी एकटा आलो नाही, तुमच्यासाठी 130 कोटी देशवासीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये येथील ब्रिगेडने बजावलेली भूमिका देशातील प्रत्येक नागरिकाचे मन अभिमानाने भरते, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी, नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचून तेथील जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींचा ताफा लाल दिव्याशिवाय दिल्लीतून निघाला होता. कोणत्याही विशेष संरक्षणाशिवाय ते गेले. पीएम मोदींची गाडीही ट्रॅफिक सिग्नलवर थांबली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: