पेट्रोल- डिझेल दरवाढ रोखण्यासाठी भाजपला पराभूत करा – नवाब मलिक

मुंबई : पेट्रोल डिझेल दरवाढ आणि महागाई जास्त होण्यापासून रोखायची असेल तर केंद्रातील भाजप सरकाला असेच पराभूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात ५ रुपये तर डिझेलच्या दरात १० रुपये कमी केले आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पोटनिवडणूकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले नाही यामुळे जनतेला खूश करण्यासाठी प्रयत्न केला जातोय असे विरोधकांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाल्याचे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, भाजपने मोठं मन दाखवायला मन असावं लागते मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार, ५ रुपयांची नोट दाखवत आहात, किमान २५ रुपये दाखवायची होती आणि नंतर ५० दाखवायला पाहिजे होती. पहिले १०० रुपये वाढवायचे आणि नंतर ५ रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन मग १०० रुपये वाढवले हे सुद्धा मोठं मन आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तर ज्यांचे मन कठोर ते १००, दीडशे रुपये पेट्रोल करु शकतात असे राऊत म्हणाले. लोकं पेट्रोल पंपावर १५ रुपयांचे डिझेल टाकत आहेत. समोर मोदींचे होर्डिंग लावलेले असते आशीर्वाद देत असतात, हेही दिवस जातील २०२४ साली आम्ही पुन्हा पराभूत करु असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: