पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यतेल, डाळी आणि गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत-रुपाली चाकणकर


पुणे:ऐन दिवाळीत राज्यासह देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईत महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यतेल, डाळी आणि गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या मागणीचे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविण्यात आले आहे.ट्विट करत रुपली चाकणकरांनी डाळी, खाद्यतेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्क्यांची सवलत देण्याची मागणी केली आहे. ”ऐन दिवाळीत गॅसदरवाढ तब्बल 15 रुपयांनी झाली.उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पञ पाठवून, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेल, दाळ, गॅस सिलिंडर यामध्ये दिवाळी सणासाठी 50% सवलत देण्यासाठी मागणी.” असे ट्विट रुपली चाकणकरांनी केले आहे.

तसेच, ”२०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींनी विकासाच्या नावावर मते मागितली. उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे अश्रू पुसू, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, महागाई कमी करु, अशी वचने दिली. आम्हीही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवला. पण आज महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्यतेल महागले आहे, तीनशे – साडेतीनशे रुपयांचा सिलेंडर आज एक हजार रुपयांपर्यत गेला आहे. पेट्रोल डिझेलने तर केव्हाच शंभरी पार केली.

अशातच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरही महागला. कोरोनात वाचलेला दिवाळीत महागाईने मरतो की काय अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे महिलांही चिंतेत आहेत. आता तरी आम्हा महिलांच्या मागण्या मान्य कराव्यात, खाद्यतेल, डाळी आणि गॅस सिलेंडर दरात किमान ५० टक्के सवलत द्यावी आणि महिलांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी रुपली चाकणकरांंनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. याचबरोबर, राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरातील महिला या मागणीचे पत्र भाजप लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत पोहचवणार असल्याचेही रुपाली चाकणकरांनी म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: