सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून विनय सूर्या यांची नियुक्ती

मुंबई : सूर्या रोशनी या भारतातील सर्वांत मोठ्या स्टील पाइप्स, लायटिंग व कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने होल टाइम डायरेक्टर श्री. विनय सूर्या यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. ही नियुक्ती २६ ऑक्टोबर, २०२१ पासून लागू होईल. श्री. विनय सूर्या यांनी ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे आणि कंपनीची दृष्टी तसेच धोरणांमध्ये त्यांचे प्रमुख योगदान आहे. दीर्घकालीन दृष्टी, मेहनत आणि समर्पण यांच्या जोरावर त्यांनी जगभरात स्टील पाइप निर्यातीला सुरुवात केली.

सूर्या रोशनीचे अध्यक्ष जे पी अगरवाल ही नियुक्ती जाहीर करताना म्हणाले, “श्री. विनय सूर्या यांचे व्यवस्थापकीय संचालक पदावर स्वागत करताना मला आनंद होत आहे. २०१२ पासून व्यवस्थापकीय संचालकपदावर असलेले श्री. राजू बिस्ता यांच्या बरोबरीने आता श्री. सूर्या जबाबदारी उचलतील. श्री. विनय सूर्या यांच्याकडे नेतृत्वाची उत्तम पार्श्वभूमी (ट्रॅक रेकॉर्ड) आहे, मार्केटिंगचा त्यांना खंदा अनुभव आहे, धोरणे आखण्यात ते कुशल आहेत तसेच क्लाएंट्सशी दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याची अनन्यसाधारण क्षमता आहे. सूर्या रोशनीला नवीन उंचीवर नेण्यासाठी ते संयुक्तपणे काम करतील.”

विनय सूर्या यावेळी म्हणाले, “माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी आमचे अध्यक्ष आणि बोर्डाचा ऋणी आहे. बदलत्या ढोबळ (मॅक्रो) वातावरणात, सूर्याला आणखी भक्कम, चपळ व चैतन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने, आम्ही काम करत राहू. आमच्याकडे उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रोफेशनल्सची समर्पित टीम आहे आणि आम्ही सगळे मिळून नवीन उंची गाठू याबद्दल मला खूप आत्मविश्वास आहे. कोविड साथीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी सूर्याने अनेक उपाय केले आणि भारतीय जनतेच्या कल्याणासाठी आम्ही हे प्रयत्न नक्कीच वाढवू. आम्ही सूर्या रोशनीच्या नवीन दृष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्या सर्व संबंधितांना अधिकाधिक मूल्य देण्यासाठी काम करत राहू.”

Leave a Reply

%d bloggers like this: