fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsTECHNOLOGY

नवीन नोकिया टी २० टॅबलेटचे भारतात पदार्पण

 नोकिया फोन्स बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतात नवा नोकिया टी२० टॅबलेट १५,४९९ रुपयांपासून पुढच्या आकर्षक मूल्य किमतीला सादर केला आहे.  जागतिक पातळीवरील लॉन्चनंतर अवघ्या महिन्याभरात या टॅबलेटची भारतात विक्री सुरु होत आहे.  डिझाईनबांधणी दर्जाअतुलनीय बॅटरी लाईफसिक्युरिटी अपडेट्स व अपग्रेड्स या सर्व बाबतीत नोकिया फोन्सची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये या टॅबलेटमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

 

नोकिया टी२० चे पदार्पण म्हणजे नवीन टी-सीरिजची सुरुवात आहे.  जेव्हा काम करत असाल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी आणि मनोरंजनाचा लाभ घेत असाल तर त्याचा मनोसोक्तपणे आस्वाद घेता येण्यासाठीदीर्घकाळ चालेल असे बॅटरी-लाईफ यामध्ये आहेअतिशय सुस्पष्ट २के स्क्रीनतीन वर्षांपर्यंत दर महिन्याला सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन वर्षे निःशुल्क ओएस अपग्रेड्स पुरवले जाणार आहेत.

विश्वसनीय सुरक्षा व सॉफ्टवेयर नैपुण्य:

या टॅबलेटला दोन वर्षे अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स आणि तीन वर्षे दर महिन्याला सुरक्षा अपडेट्स पुरवले जातील जेणेकरून तुम्ही तुमच्या माहितीच्या सुरक्षेबाबत अगदी निश्चिन्त राहू शकाल. मुलांना नवनवीन ऍप्सपुस्तके आणि व्हिडिओ शोधता व पाहता यावेत यासाठी गूगल किड्स स्पेस हा मुलांसाठी विश्वसनीय किड्स-मोड नोकिया टी२० मध्ये उपलब्ध आहे. गूगल किड्स स्पेस मुलांच्या गूगल अकाउंटसोबत काम करते त्यामुळे फॅमिली लिंक पॅरेंटल कंट्रोल्समार्फत त्यावर नीट लक्ष ठेवता येते व त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

 

नॉर्डिक डिझाईनचा वारसा

नवीन नोकिया टी२० मध्ये अतिशय सुबक व सहजसोपे सौंदर्य असलेले नॉर्डिक डिझाईन आहेज्यामध्ये प्रत्येक तपशीलप्रत्येक कोपरा आणि पृष्ठभाग वापराची सुविधा वाढवतात.  याची मजबूत मेटल बॉडी संरचना आणि पॉलिश्ड थ्रीडी डिस्प्ले फ्रेम पातळ मेटल बॉडीला मोठा डिस्प्ले अगदी चपखलपणे जोडतात आणि त्यामुळे टिकाऊपणा वाढतो.

 

कामशिक्षण आणि मनोरंजन यामध्ये जराही अडथळा येऊ नये यासाठी दीर्घकाळ चालणारी बॅटरी

नोकिया टी२० मध्ये ८२०० एमएएच बॅटरी आहे जी १५ तासांच्या वेबसर्फिंगसाठी७ तासांच्या कॉन्फरन्स कॉल्ससाठी किंवा कुटुंबासमवेत एखादा नवा सिनेमा पाहत असाल तर तब्बल १० तास सहज चालते.  या टॅबलेटमध्ये अधिक वेगवान चार्जिंगची सुविधा आहेत्यामुळे तुमचे कामअभ्यास किंवा मनोरंजन पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागत नाही.

 

संपूर्ण लक्ष खिळवून ठेवेल असा व्ह्यूइंग अनुभव:

बिंज वॉचर्स आणि कॅज्युअल गेमर्सना नोकिया टी२० चा २के डिस्प्ले सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभव प्रदान करतो.  व्हिडिओ कॉल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहेमहत्त्वाच्या बिझनेस मीटिंग्स असोत किंवा कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत ग्रुप कॉल असो नोकिया टी२० अगदी सुयोग्य टॅबलेट आहे.  हा टॅबलेट ब्ल्यू लाईट सर्टिफाईड आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर जास्त ताण देखील येऊ देत नाही.

 

स्टिरीओ स्पीकर्स आणि ओझो प्लेबॅकने सुसज्ज असलेला नोकिया टी२० तुम्हाला ऐकण्याचा अक्षरशः गुंग करेल असा अनुभव मिळवून देतो. ड्युएल मायक्रोफोन्समुळे तुम्ही घराबाहेर असाल आणि आजूबाजूला बरेच आवाज असतील तरी तुम्ही बोललेले नीट ऐकू जाईल याची पक्की खात्री असते.

 

विश्वसनीय व्यवसाय भागीदार

गूगलच्या काटेकोर व्यवसाय अटींची पूर्तता करणाऱ्या अँड्रॉइड रेकमेन्डेड डिव्हायसेसच्या (एईआर) सर्वात मोठ्या ताफ्यात आता नोकिया टी२० देखील दाखल होत आहे.  सहजसोपा वापर आणि वन-स्टॉप-शॉप इंटरफेसवरून तैनात करण्यात आलेल्या डिव्हायसेसचे व्यवस्थापन करता यावे यासाठी डिझाईन करण्यात आलेली एंटरप्राइज मोबिलिटी मॅनेजमेंट सुविधा एचएमडी एनेबल प्रोच्या सहयोगाने याचे काम चालते.

श्रेणीतील सर्वोत्तम अनुभवांसाठी विश्वसनीय भागीदारी

स्पॉटिफाय नोकिया टी२० मालकांना ७० मिलियन ट्रॅक्स आणि २.९ मिलियन पॉडकास्टस् उपलब्ध करवून देईल. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी: Spotify

 

किंमत आणि उपलब्धता

नोकिया टी२० भारतामध्ये निळ्या रंगात उपलब्ध आहेयामध्ये वाय-फाय ३जीबी/३२जीबीवाय-फाय ४जीबी/६४जीबी आणि वाय-फाय + एलटीई ४जीबी/६४जीबी कॉन्फिगरेशन्स असून किंमत १५४९९ रुपयांपासून पुढे आहे. मोठ्या ऑफलाईन रिटेल स्टोर्समध्ये तसेच Nokia.com वर आजपासून व फ्लिपकार्टवर उद्यापासून उपलब्ध असणार आहे. प्रमुख कन्ज्युमर फायनान्स ब्रॅंड्समध्ये आकर्षक फायनान्स ऑफर्स उपलब्ध असणार आहेत.

३जीबी/३२जीबी वाय-फाय १५,४९९ रुपये
४जीबी/६४जीबी वाय-फाय १६,४९९ रुपये
४जीबी/६४जीबी एलटीई + वाय-फाय १८,४९९ रुपये

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading