भाजपा सोबतच्या युतीमध्ये नको ती अंडी उबवली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

बारामती : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्तिथित इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि पवार कुटुंबाच कौतुक केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी आपला जुना मित्र असलेल्या भाजपला देखील टोला लगावला. यावेळी पुण्यानंतर बारामती राजकारणाचं दुसरं केंद्र बनल्याची कोपरखळी त्यांनी मारताच व्यासपीठावर बसलेल्या अजित पवार यांनी बाजू सावरत दिलेलं उत्तर देखील चांगलाच हशा पिकवून गेलं.

उद्ध ठाकरेंनी इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करताना शरद पवार आणि पवार कुटुंबाचं कौतुक केलं. “पवार साहेबांसारखा तरणाबांड नेता… सुप्रिया तू खोटंच सांगितलं असेल सहस्त्रचंद्रदर्शन. ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आहे आणि अजूनही ते मार्गदर्शन करताच आहेत .पवार साहेब महाराष्ट्रासोबत सर्व संस्थांचं नेतृत्व करत आहेत.पवार कुटुंबीय अत्यंत मनापासूनआणि मेहनतीने त्यासाठी काम करतायत. पवार कुटुंब विकासाच्या ध्यासात रमलंय. विकास, विकास आणि विकासाच्या पुढे विकास”, असं उद्धव ठाकरेनी भाजप ला टोला लगावलाय.

पाठिंबा जरी देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. विघ्नसंतोषी खूप आहेत. पण या कामातून जो आनंद मिळतो, तो त्या विघ्नसंतोषींना कधीच मिळणार नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

Leave a Reply

%d bloggers like this: