fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

स्वदेशी वस्तू खरेदी करा’ या विषयात अभाविप च्या वतीने बाजारपेठेत जनजागृती

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेले ७ दशके शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, अभाविप हे देशातील सगळ्यात मोठे छात्र संघटन म्हणून नामांकित आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करण्यासाठी आज विविध ठिकाणी हातात पोस्टर्स पकडून जनजागृती करण्यात आली, विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू , विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर नि आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका! पुणेकरांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर देशहिताच्या कार्यात हातभार लावून, स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात असे आव्हान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य पुणे भाग संयोजक क्षुधांत पाटील ह्यांनी केले. बलशाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन संपूर्ण देशाला केले आहे. यावेळी क्षुधांत पाटील , निखिल पाटील, तन्मय ओझा , मंदार लडकत, शंतनु ढमढेरे, गौरी पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading