अनिल देशमुख यांच्या नंतर बाकीचे नेते सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यात जातील – चंद्रकांत पाटील


पुणे:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख   हे काल ईडी  कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर 13 तास चाललेल्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडांचा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं. आश्वासित करायचं .अशाच माणसाला अटक झाल्याने समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झाले आहे. याचप्रमाणे  अनिल देशमुख यांच्या नंतर बाकीचे नेते सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यात जातील . अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक झाली. नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: