पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आदरांजली 

पुणे : शहर जिल्हा काँग्रेंस कमिटीतर्फे देशाचे पहिले गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे माजी आमदार मोहन जोशी व माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘स्व. इंदिराजी गांधी या देशावर निस्सिम प्रेम करणाऱ्या, जाती धर्माच्या पलिकडे विचार करणाऱ्या, देशामध्ये सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रणाची आहुती देणाऱ्या आयर्न लेडी होत्या. सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर, कडक, शिस्तप्रिय व स्पष्ट वक्ता होते. जगभरात त्यांची महती लोहपुरूष म्हणून झाली होती. तसेच ते प्रखर देशभक्त होते. त्यांचा धर्मांध, जातीयवादी शक्तींना प्रखर विरोध होता. देशाचे सैन्य मजबूत करून राष्ट्राच्या सीमा स्व. पटेल यांनी मजबूत केल्या. पोखरण येथे अणुस्फोट करून जगातील मोठ्या देशांबरोबर भारताचे नाव जोडण्याची किमया स्व. इंदिराजी गांधी यांनी साधली. त्यांनी केलेले कार्य देश कधीही विसरू शकणार नाही. या दोन्ही देशभक्त नेत्यांना मी आज भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.’

यावेळी नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, रजनी त्रिभुवन, प्रा. वाल्मिक जगताप, शिलार रतणगिरी, ॲड. सुरेश बोराटे, अनिल अहिर, प्रविण करपे, शोएब इनामदार, हनुमंत राऊत, आशिष व्‍यवहारे, घन:श्याम निम्हण, संगिता क्षिरसागर, शारदा वीर, भगवान कडू, विजय चंडालिया, ॲड. राजशेखर गायकवाड, अनुप बेगी, ॲड. शाबीर खान, चेतन आगरवाल, अविनाश अडसूळ,  हेरॉल्ड मॅसी, सचिन सावंत, अजित जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस द. स. पोळेकर यांनी केले तर आभार ज्योती परदेशी यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: