प्रहार अपंग क्रांती संघटनेचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
पुणे: कोरोना महामारी मुळे दिव्यागाचे रोजगार, उद्योग धंदे व्यवसाय बुडाले असून दिव्यांगांचा
उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे.अशा अवस्थेमध्ये दिव्यांग बांधव अडी अडचणीत आहे.तरीही
जिल्हा परिषद दिव्यागा कडे लक्ष देत नसल्यामुळे. आज पुण्यात प्रहार अपंग क्रांती संघटनेने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षा रेखा धुमाळ यांनी केले. या धरणे आंदोलनाला सुभाष दिवेकर ,शिवाजी शिंदे ,कैलास सावकर, जीवन टोपे, अर्चना घुगरे, संदीप जगताप, सुरेश जगताप, व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांग बांधवांकडून आंदोलनाच्या वेळी सरकारचा निषेध करण्यात आला.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्या
1) डी डी आर सी केंद्र शासनाची योजना असून डीडी आ र सीची इमारत बांधकामासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांनी अर्थसाह्य करावे.
2) पुणे जिल्हा परिषदेने अन्यायकारक पद्धतीने
दिव्यांग निधी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रासाठी साडेतीन कोटी रुपये तरतूद करावी.
3) जिल्हा परिषदेच्या पाच टक्के निधी तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवा ह भक्ता जमा करून तात्काळ वाटप करून दिव्यांची दिवाळी गोड करावी.
