Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

उत्तम आरोग्याकरीता क्षमता, शक्ती आणि लवचितकतेचा समतोल गरजेचा- जुगल राठी

पुणे : आजच्या जगात स्पर्धेला खूप महत्व आहे. परंतु स्पर्धेत उतरल्यावर त्यातून नेहमी चांगल्या गोष्टी प्रत्येकाने घ्यायला हव्या. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रत्येकाकडे क्षमता असते. फक्त त्याचा वापर किती आणि कसा करावा कळले पाहिजे. आपल्यातील क्षमता, शक्ती आणि लवचिकता ही त्रिसुत्री लक्षात ठेवून त्याचा योग्य समतोलता साधला तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते., असे मत सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांनी व्यक्त केले.

बंगळुरू येथे झालेल्या ४७ व्या सबज्युनियर नॅशनल जलतरण स्पर्धेत पुण्याच्या झील मालानी, लव परतानी व कुश परतानी यांनी पदकांच्या माध्यमातून मिळविलेल्या यशाबद्दल निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांचा सन्मान सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी नवचैतन्य हास्य क्लबचे संस्थापक विठ्ठल काटे, वल्लभ व्यास, जयप्रकाश सोनी, सुनील बिहानी, वसंत पाटील, श्रीराम परतानी, सीए संदेश मालानी आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, सन्मानचिन्ह व कोरोना सुरक्षा किट देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. कुश परतानी, लव परतानी यांना शौर्य करंदीकर, शुभंकर ठोसर आणि झील मालानी हिला सोजस गोडसे व टिळक तलावाचे सचिव अमित गोळवलकर यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

विठ्ठल काटे म्हणाले, खेळाडूंनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर त्यांनी पुढे जाण्याची उर्जा मिळते. त्यामुळे मुलांचे कलागुण ओळखून लहान वयातच त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांनी लहान वयात आपले ध्येय निश्चित केले तर त्यांना मार्ग मिळतात, असेही त्यांनी सांगितले.

सन्मानाला उत्तर देताना लव व कुश परतानी म्हणाले, शालेय वयात जलतरण शिकण्यास आम्ही सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू स्पर्धेकरीता तयारीला सुरुवात केली. आसाम, पंजाबच्या संघासोबत आम्ही जिंकलो. मात्र, त्यानंतर केरळच्या संघासोबत लढा देणे आव्हानात्मक होते. यावेळी अटितटिचा खेळ झाला. यापुढे अधिक जोमाने सराव करुन देशासाठी जलतरणात खेळण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. झील मालानी हिने मनोगत व्यक्त केले. सुनील बिहानी यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश सोनी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading