जनता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला जागा दाखवून देईल -चंद्रशेखर बावनकुळे
पुणे: राज्यात आगामी महानगरपालिका व नगरपालिका निवडणूका काही दिवसां वर येऊ घातल्या आहेत. तरी राज्य सरकारने ओबीसी समाजाला अजून आरक्षण दिले नाही त्यावर राज्य राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला जनता त्यांची जागा दाखवून देईल. असे भाष्य माजी मंत्री व भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सुशील मेंगडे, अमृत मारणे सरचिटणीस प्रतीक देसरडा उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विविध मुद्यांवर भाष्य केले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ही यात्रा अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात सेल्फी पॉइंट ही स्पर्धा राबवत आहोत याला आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटत आहे. महिलांवरील होणारे अत्याचार,रोजगार आम्ही कसे देवु शकतो असे अनेक प्रश्न आम्ही या यात्रे मधून तरुणांई समोर मांडत आहोत.असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राज्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक चौकात शिवसेनेची शाखा आहे तशी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची प्रत्येक चौकात शाखा असेल असे बावनकुळे म्हणाले. मी काल बिबवेवाडी येथील या 18 वर्षे मुलीवर वाईट प्रसंग घडला त्या मुलीच्या परिवाराची काल मी भेट घेतली दोन कोटी त्या परिवाराला सुपूर्त केले.
