Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अभाविप कराड जिल्हा समिती व शहर कार्यकारिणी जाहीर

कराड : केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघठन असलेली संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड जिल्हा समिती व शहर कार्यकारिणी घोषणेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश शेळके सर व प्रमुख वक्ते अभाविप चे प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे व निर्वाचन अधिकारी डॉ. मिहिर वाचासुंदर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

अभाविप कराड जिल्ह्याची समिती व शहर मंत्री व शहर अध्यक्ष यांची घोषणा निर्वाचन अधिकारी मिहिर वाचासुंदर यांनी केली तर शहर कार्यकारणी ही शहर अध्यक्ष अमितराज माने सर यांनी घोषित केली.जिल्हा संयोजक अजय मोहिते जिल्हा सहसंयोजक, श्रेयस महाजन, श्रावणी नाईक, आकाश शेडगे कार्यालय प्रमुख विश्वजीत पाटील, कडेगाव तालुका प्रमुख दत्तात्रय जाधव, विटा तालुका प्रमुख चैतन्य शिर्के, ईश्वरपूर तालुका प्रमुख अभिमन्यू वेदपाठक, अशा प्रकारे जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.

तसेच कराड शहर अध्यक्ष अमितराज माने शहरमंत्री गणेश डुबल, शहर सहमंत्री, सुमित पवार, सानिका गढले, ऋत्विक पाटील वसतिगृह प्रमुख हर्षवर्धन भोसले, कार्यालय प्रमुख ऋत्विक पाटील, कलामंच संयोजक नेहा भोसले, सोशल मीडिया प्रमुख अक्षय बस्ताळ, संपर्क प्रमुख आकाश पाटील, व्यवस्था प्रमुख चैतन्य गुरव, SFS प्रमुख श्रेयस भोसले, ज्ञान मंथन प्रमुख ऋषिकेश थोरात, एकलव्य प्रमुख आदित्य मोहिते, या सर्वांना जबाबदारी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवतेज शेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदित्य मोहिते यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading