पियाजिओ वेईकल्सकडून मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर एक्स्पेरिअन्स सेंटरचे उद्घाटन
मुंबई : पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटालियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि भारताच्या आघाडीच्या लघु व्यावसायिक वाहनांच्या उत्पादक कंपनीने मुंबईमध्ये त्यांचे पहिले थ्री-व्हिलर ईव्ही एक्स्पेरिअन्स सेंटर ‘एव्ही मोटर्स’चे उद्घाटन केले. खासदार गजानन किर्तीकर आणि महाराष्ट्र उपपरिवहन आयुक्त सचिनकुमार गिरी यांच्या हस्ते या डिलरशिपचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील हे अनोखे एक्स्पेरिअन्स सेंटर वाहनांच्या परिपूर्ण आपे इलेक्ट्रिक श्रेणीला दाखवेल. या श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक कार्गो आपे ई-एक्स्ट्रा आणि पॅसेंजर ब्रॅण्ड आपे ई-सिटी या वाहनांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, ”मला आज येथे पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.च्या महाराष्ट्रातील पहिल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर एक्स्पेरिअन्स सेंटरचे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र ईव्ही पॉलिसी २०२१ चा मुख्य उद्देश राज्यामध्ये बीईव्हींच्या अवलंबतेला चालना देण्याचा आहे, ज्यामुळे ते २०२५ पर्यंत १० टक्के नवीन वाहन नोंदणींमध्ये योगदान देऊ शकतील. आम्ही पियाजिओ सारख्या ऑटोमेकर्सना सुलभपणे व्यवसाय करण्याच्या सुविधा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्हाला अभिमान वाटतो की,+ पियाजिओ आपल्या राज्यातील बारामती येथे त्यांच्या उत्पादन केंद्रामध्ये ही उच्च तंत्रज्ञानाने युक्त वाहने उत्पादित करत आहे.”
पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय प्रमुख सजू नायर म्हणाले, ”महाराष्ट्र राज्य धोरण २०२१ चा २०२५ पर्यंत सार्वजनिक परिहवन व शेवटच्या अंतरापर्यंत डिलिव्हरी वाहनांचे २५ टक्के इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा दृष्टिकोन आहे. मुंबई हे महानगर असण्यासोबत देशाची आर्थिक राजधानी आहे. शहराला परिवहनाचे कार्यक्षम व स्थिर मोड्स देणे हे आमच्यासारख्या कंपन्यांसाठी महत्त्वाचे आहे. आमच्या ईव्ही श्रेणीसह आमचा झीरो कार्बन उत्सर्जनासह माल व सार्वजनिक वाहतूकीसाठी दर्जात्मक उत्पादने देण्याचा मनसुबा आहे. वाहनांची आपे इलेक्ट्रिक श्रेणी कार्यसंचालनाचा कमी खर्च आणि उच्च दर्जाच्या रेंजसह अधिकतम आरामदायी सुविधांमुळे उच्च उत्पन्न देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आम्ही ३ वर्षांसाठी सर्वोत्तम वॉरंटी व फ्री मेन्टेनन्स पॅकेज देखील सादर केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना कोणत्या चिंतेशिवाय आमच्या इलेक्ट्रिक श्रेणीचा अवलंब करणे सुलभ होईल.”
