Wednesday, April 29, 2026
Latest NewsPUNE

राज्य सरकार ने विद्यार्थ्यांचे नुकसान केले तर भाजप युर्वा मोर्चा राज्यपालांची भेट घेणार – विक्रांत पाटील

पुणे:मागच्या  रविवारी आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ पहायला मिळाला .पुणे व नाशिक मध्ये होण्याऱ्या  परीक्षांच्या व्यवस्थापनामध्ये बराच घोळ आढळून आला. त्या विरुद्ध भाजपच्या युर्वा मोर्चा ने पुण्यात आंदोलन केले होते. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ, सीट नंबर यांमध्ये घोळ आढळून आला होता. त्या विरुद्ध भाजप युवा मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी राजकारण करू नये .जर राज्य सरकार ने  विद्यार्थ्यांचे नुकसान केले तर त्या विरोधात भाजप युवा मोर्चा  राज्यपालांची भेट घेणार अशी माहिती आज भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी  दिली.

विक्रांत पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे जर राज्य सरकारने नुकसान केले .तर  भाजप युवा मोर्चा अख्ख्या महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा विक्रांत पाटील यांनी आज दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading