Sunday, September 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

NCPA- 29 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार

मुंबई : जवळजवळ दीड वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर, मुंबईची प्रमुख कला आणि सांस्कृतिक संस्था, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) 29 ऑक्टोबरपासून पुन्हा आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करण्यास सज्ज झाली आहे. एका विशेष लाईन-अपसह, नाट्यगृहापासून पाश्चात्य शास्त्रीय आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि आंतरराष्ट्रीय संगीतापर्यंत प्रत्येक कलाप्रेमीसाठी यात काही ना काही आहे.


पुन्हा उद्घाटन करताना, श्री खुश्रू एन सुंतूक, अध्यक्ष, एनसीपीए म्हणाले, “गेली दीड वर्षे एनसीपीएसाठी आव्हानात्मक राहिली. पण हा कठीण काळ आता समाप्त होत आला आहे. महामारीमुळे आपले आयुष्य विस्कळीत झाले. पण त्या अनुभवानंतर आता आपण अधिक मजबूत झालो आहोत, ह्या गोष्टीचा आम्हांला आनंद आहे. कला सादर करणे, ती जतन करणे आणि तिला प्रोत्साहन देणे हा आमच्या अस्तित्वाचा पाया आहे. आमच्या कॅम्पसमध्ये पाहुण्यांचे पुन्हा स्वागत करताना आम्ही आनंदित आहोत. प्रसिद्ध मराठी नाटकासह आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू. एका क्युरेटेड कार्यक्रमासह आमचे निवासी संगीतकार उद्घाटनाच्या मैफलीसाठी सज्ज झाले आहेत.

भारतीय संगीत, नृत्य आणि आंतरराष्ट्रीय संगीत प्रकारातील प्रख्यात कलाकार रंगमंचावर परतण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही सर्व सुरक्षा आणि स्वच्छता प्रोटोकॉलचे पालन करत असून त्यामुळे आमचे प्रेक्षक पुन्हा एकदा लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्याच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतील.”
पहिल्या संध्येला प्रशांत दामले यांचे अतिशय यशस्वी आणि गाजलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक दाखवण्यात येईल. ह्या नाटकामधून मराठी रंगभूमीचा एक वेगळा पैलू दिसून येईल. उद्घाटनानंतरच्या संध्याकाळी अनुभवी संगीतकार लुई बँक्स आणि त्यांचे कलाकार जॅझ प्रेमींसाठी ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’ घेऊन येतील आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. SOI सदस्यांना एकेका कलाकाराच्या रूपात सादर करत संगीत दिग्दर्शक मराट बिसेंगालीव यांच्या नेतृत्वाखाली SOI चेंबर ऑर्केस्ट्रा प्रिय क्लासिक्सच्या कार्यक्रमासह स्टेजवर परत येईल.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या संध्येच्या मैफलीत दिग्गज राशिद खान इन कॉन्सर्ट असतील. दोन प्रख्यात शास्त्रीय नर्तकी रमा वैद्यनाथन आणि मल्लिका साराभाई ह्या अनुक्रमे ‘प्रतिबोधना – द अवेकनिंग’ आणि ‘जेम्स ऑफ कुचीपुडी’ ह्या त्यांच्या विशेष परफॉर्मन्ससह स्टेजवर परततील.आपल्या उत्कृष्ट ध्वनीशास्त्रासाठी ओळखले जाणारे व सुरेख डिझाइन केलेले टाटा थिएटर ह्या सर्व सादरीकरणाचे ठिकाण असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading