Wednesday, November 18, 2026
BusinessLatest News

भारतातील टाइप २ मधुमेही प्रौढांसाठी, अल्पशा दरात बाजारात औषध उपलब्ध करून देणारी ग्लेनमार्क ठरली पहिली कंपनी

पुणे  : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने आपल्या नवीन पेटंटसंरक्षित, जागतिक स्तरावरील संशोधनातून विकसित करण्यात आलेला सोडिअम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर इनहिबिटर रेमोग्लिफ्लोझिन एटाबोनेट आणि डीपीपी४ हा आणखी एक व्यापक स्तरावर वापरला जाणारा इनहिबिटर व्हिल्डाग्लिप्टिन यांचे मेटफॉर्मिनसोबत (टाइप २ मधुमेहींच्या उपचारात सर्वोच्च प्राधान्य दिले जाणारे औषध) केलेले फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन बाजारात आणले आहे. हे फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी निर्देशित आहे.

रेमोग्लिफ्लोझिन + व्हिल्डाग्लिप्टिन + मेटफॉर्मिन यांचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन बाजारात आणणारी ग्लेनमार्क ही जगातील पहिली कंपनी आहे आणि हे एफडीसी औषध उपलब्ध असलेला भारत हा पहिला देश आहे. ग्लेनमार्कला फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या उत्पादन व मार्केटिंगसाठी सप्टेंबर २०२१च्या अखेरीस, डीसीजीआयने (भारतातील औषध मंजुरी प्राधिकरण) मंजुरी दिली. रुग्णामधील ग्लायकेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी हे औषध दिवसातून दोनदा घेणे अनिवार्य आहे. ग्लेनमार्कने हे औषध रेमो एमव्ही आणि रेमोजेन एमव्ही अशा दोन ब्रॅण्डनेम्सखाली बाजारात आणले आहे.

जगभरात एसजीएलटी२ आणि डीपीपी४ हे इनहिबिटर्स टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनात प्राधान्याने वापरले जाणारे पर्याय म्हणून उदयाला येत आहेत. भारतातील मधुमेहाच्या रुग्णांना नवीनतम उपचार कमी खर्चात उपलब्ध करून देण्याच्या कामात ग्लेनमार्क आघाडीवर आहे.

टाइप २ मधुमेहातील बहुतेक पॅथोफिजिओलॉजींची (आजाराशी निगडित शरीरशास्त्रविषयक प्रक्रिया) काळजी घेते. टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनातील मधुमेहरोधक औषधांच्या उतरंडीमध्ये, एफडीसीमधील एकेरी घटक, सुरुवातीच्या टप्प्यावर वापरण्याची शिफारस एएसीईच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेली आहे.याशिवाय, एसजीएलटी२वन + डीपीपी४वन + मेटफॉर्मिन यांचे एफडीसी हा यूएसएफडीएकडून मान्यतेसाठी विचार होऊ शकेल असा सध्याचा पहिला व एकमेव तिहेरी डोस आहे.

टाइप २ मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारामध्ये रुग्णांना अनेकविध मधुमेहरोधक औषधे दीर्घकाळ घेत राहावी लागतात. त्यात भारतामध्ये रुग्णांना औषधांचा खर्च स्वत:च उचलावा लागतो आणि म्हणूनच औषधांचे दर हा उपचारांच्या पालनातील महत्त्वाचा घटक ठरतो. सध्या औषधाच्या या विभागातील पूर्वीपासून अस्तित्त्वात असलेल्या ब्रॅण्ड्सच्या दैनंदिन डोसचा खर्च सुमारे ७५ रुपये असताना, ग्लेनमार्कचे रेमोग्लिफ्लोझन +व्हिल्डागिप्टिन + मेटमॉर्फिन हे प्रति टॅब्लेट १६.५० रुपये अशा ब्रेकथ्रू दराला बाजारात आले आहे; हे औषध दिवसातून दोनदा घेणे आवश्यक आहे, म्हणजेच दैनंदिन डोसचा खर्च ३३ रुपये होतो. हा खर्च, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या मेटफॉर्मिनसोबत घेण्याच्या अन्य एसजीएलटी२ आणि डीपीपी४ कॉम्बिनेशन्सच्या तुलनेत किमान ५३ टक्के कमी आहे1.

हे औषध मधुमेहावरील औषधांची उपलब्धता लक्षणीयरित्या वाढवेल आणि भारतातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे व उत्तम संशोधनावर आधारित उत्पादन परवडण्याजोग्या दरात आणेल. या कॉम्बिनेशनला, भारतातील औषध नियामक प्राधिकरण डीसीजीआयने, १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी, मंजुरी दिली आहे. मेटमॉर्फिन आणि फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनमधील कोणताही एक एकेरी-घटक (मोनो कॉम्पोनंट) ग्लायकेमिक नियंत्रण सुधारण्यास पुरेसे ठरत नसेल किंवा रुग्णाला पूर्वीपासून रेमोग्लिफ्लोझिन, व्हिल्डाग्लिप्टिन व मेटमॉर्फिन यांचे स्वतंत्र डोस दिले जात असतील, तर हे नवीन कॉम्बिनेशन उपयुक्त पर्याय ठरणार आहे.

इंडिया फॉर्म्युलेशन्स विभागाचे समूह उपाध्यक्ष अलोक मलिक म्हणाले की एसजीएलटी२आय + डीपीपी४आय + मेटफॉर्मिन असे एफडीसी टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनातील प्राधान्यप्राप्त उपचार म्हणून जगभरात उदयाला येत आहेत.ग्लेनमार्कने मधुमेहावर लक्ष केंद्रित केले आहे आणि भारतातील मधुमेहाच्या रुग्णांना नवीनतम उपचार पर्याय उपलब्ध करून देण्यात आम्ही आघाडीवर आहोत. अत्याधुनिक, विस्तृत संशोधनावर आधारित असे हे नवोन्मेषकारी फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन परवडण्याजोग्या दरात बाजारात आणता आले याचा आम्हाला अभिमान आहे. या औषधामुळे रुग्णांमधील उपचारपालनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल तसेच भारतातील टाइप २ मधुमेह नियंत्रणाबाहेर गेलेल्या रुग्णांना ग्लायकेमिक व अतिरिक्त ग्लायकेमिक लाभ पुरवण्यात या औषधाची मदत होईल

Leave a Reply