Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आरोग्य विभाग परीक्षा मध्ये घोळ अभाविपचे आक्रमक आंदोलन

पुणे: महाराष्ट्र सरकारकडून आरोग्य विभागाच्या विविध जागांसाठी रविवार दिनांक 24 ऑक्टोबर या दिवशी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांच्या व्यवस्थापनामध्ये बराच घोळ आढळून आला. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ, सीट नंबर यांमध्ये घोळ आढळून आला.

पुणे येथील आझम कॅम्पस ह्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना 45 मिनिटे उशीरा प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. यावेळी अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिकांची वाट बघत होते विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊन परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू झाला.
ही घटना लक्षात घेऊन अभाविप पुणे कार्यकर्त्यांनी लगेच परीक्षा केंद्रावर धाव घेतली व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन परीक्षा घेणाऱ्या कंत्राटी कंपनीचा व त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यवस्थापनाचा निषेध म्हणून आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत सर्व विद्यार्थी प्रश्न हाताळून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तीन वाजता दुसऱ्या जागांसाठी असलेल्या परीक्षा लक्षात घेता आंदोलनाचे स्वरूप सौम्य करून व सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी परीक्षा कंत्राटी पद्धतीने चालवणारी न्यासा कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये असूनही सरकारने त्या कंपनीला का निवडले , परीक्षा व्यवस्थापनातील हा सलग तिसरा घोळ आहे व पर्यवेक्षण करण्यासाठी अपात्र विद्यार्थी व परीक्षार्थींना मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रात सोडण्यात आले असा आरोप महानगर सहमंत्री अमोल देशपांडे, सोहम नारकर, शुभम बावचकर यांनी केला.

Leave a Reply