Thursday, July 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आगामी महानगरपालिका निवडणुकाबाबत पक्षाची अजून भूमिका स्पष्ट नाही- नाना पटोले

पुणे : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढणार का? याची राज्यात भरपूर चर्चा सुरू हे. त्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाची भूमिका आघाडी करायची की नाही? हे अजून स्पष्ट नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे ईडी, CBI च्या कारवाई करून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार ईडी, CBI च्या कारवायांना जसेच्या तसे उत्तर देणार असेही नाना पटोले म्हणाले.

संजय राऊत परवा म्हणाले होते .पुण्यात शिवसेनेचा महापौर असेल .यावर कोणी काय बोलायचं बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे, असे मत नाना पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading