Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाविद्यालयांमध्ये 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान युवा स्वास्थ्य उपक्रम राबवणार – उदय सामंत

पुणे: राज्यात महाविद्यालये राज्य सरकारने काही निर्बंध घालून सुरू केली आहेत.ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस झाले असतील त्यांना महाविद्यालया मध्ये प्रवेश देण्यात येत आहे यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालया मध्ये 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान युवा स्वास्थ्य उपक्रम राबवणार आहोत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

उदय सामंत म्हणाले,महाविद्यालया मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना येता यावे यासाठी राज्य सरकार साधारण 40 लाख विद्यार्थ्यांचं लसीकरण करणार आहे. या लसीकरण मोहिमेचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना मुळे खुप दिवस महाविद्यालय बंद होती त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यावर उदय सामंत म्हणाले, भविष्यात जर कोरोनाची साथ अशीच राहिली तर येत्या पुढील काळात ऑफलाईन परीक्षा घेण्याचा विचार सुरू असे सामंत म्हणाले, कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही . ह्याची राज्य सरकार व महाविद्यालये जबाबदारी घेणार आहे.

सीओईपी ला अजून विद्यापीठाचा दर्जा दिला नाही त्यावर सामंत म्हणाले .COEP ला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय लवकरच होईल असे सामंत म्हणाले. येत्या काळात महाविद्यालयात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. तसेच एक महिन्यात शिक्षक अकॅडमी सुरू करण्याचा विचार आहे असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading