Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर!

झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे, त्यामुळे त्यातील सगळीच पात्र प्रेक्षकांना भावत आहेत,
या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिक मध्ये सुरु आहे. या मालिकेचं चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. यावर मालिकेत एक सीन पण शूट करण्यात आला आहे, ज्यात सिद्धार्थ अदितीचं बिबट्यापासून रक्षण करतो. हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Leave a Reply