पुणे शहरामध्ये कोरोनाचे नवीन 91 रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून शंभर च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 91नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 113रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 36हजार 39इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 93हजार 610इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2पुणे महापालिका हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9069जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 960रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 160रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5763 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
