Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

मनपाच्या वैद्यकीय विभागातील निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी…..योगेश बहल


पिंपरी :  पिंपरी -चिंचवड महापालिकेची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे. साक्षात धनलक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या या शहरविकासाच्या मंदिरास भाजपामुळे भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. पालिकेत लूटणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर  योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी राष्ट्वादी शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महीला शहर अध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, 
कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी योगेश बहल म्हणाले की, पालिकेचे सर्वात जबाबदार घटक असणाऱ्या आयुक्तांचा कसलाही धाक अधिकारी,
पदाधिकारी यांना राहिला नाही म्हणूनच आयुक्त राजेश पाटील यांच्या नाकाखाली बिनधास्त पालिकेची लुट सुरू आहे. बोगस, खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून पालिका आयुक्तांनाच ‘टिकली’ मारून जाणाऱ्या बोगस ठेकेदारांकडे, भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे कानाडोळा का केला जातोय असा सवाल माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला आहे.
बोगस, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बहल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणेबाबत निविदा (क्र. 10/2021-22) प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये एकुण चार कंत्राटदार सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस प्रा.लि., बीव्हिजी इंडिया लिमिटेड, रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. आणि श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये तांत्रिक मुल्यमापनाचे गुण आणि निविदेतील दर समान आल्यामुळे बीव्हिजी इंडिया लिमिटेड, रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. आणि श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या तीन ठेकेदारांना काम विभागून देण्यात आले आहे. तर प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस प्रा.लि. यांना तांत्रिक मुल्यमापनामध्ये गुण कमी आल्याने पात्र ठरल्यानंतरही काम देण्यात आलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे तांत्रिक मुल्यमापन हे दराचे दुसरे पाकिट उघडण्यापूर्वी होणे अपेक्षित असताना केवळ प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस यांना अपात्र करण्यासाठी तांत्रिक मुल्यमापन करण्यात आले आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading