अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र आयोजित प्रदर्शन 22 ते 2 ऑक्टोबर दरम्यान
पुणे:अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र आयोजित महिला उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन दि. 22 ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत दरम्यान नूतन मराठी प्राथमिक शाळेत या ठिकाणी आयोजित केले आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव यांनी दिली .
या पत्रकार परिषदेला अनघा जोशी ,मकरंद माणकिकर, उल्हास पाठक उपस्थित होते. विश्वनाथ भालेराव म्हणाले, या प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा भव्य दिव्य सोहळा गुरुवार दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नूतन मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित केला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्याताई येरवडेकर अध्यक्ष प्रधान संचालिका सिंबोयौसिस, डॉक्टर रवींद्र शिसवे साहेब सह पोलीस आयुक्त पुणे शहर, रमेश डोईफोडे निवासी संपादक सकाळ पुणे, मंजुश्री खेडेकर अध्यक्ष शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका उपस्थित राहणार आहेत.
