पुणे शहरामध्ये कोरोनाच्या 119 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 112नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 119रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 33हजार 057इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 93हजार 296इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 6पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9067जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 994रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 158रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4780 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
