Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

दगडूशेठ गणपती ट्रस्टचा वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड लंडनतर्फे गौरव 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणेचा कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड लंडन कड़ून सर्टिफिकेट आॅफ रेकग्निशन (स्वित्झरलँड) देऊन गौरव करण्यात आला. गणपती मंदिरात वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने व कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्याकडे सर्टिफिकेट आॅफ रेकग्निशन सुपूर्द करण्यात आले.

वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डचे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७० देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोना मुक्तीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्टिफिकेट आॅफ रेकग्निशन (स्वित्झरलँड)  ने  संस्थाना सन्मानित करण्यात येत आहे.

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयात गेले अनेक वर्षे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची सेवा दिली जाते. मात्र, कोविडच्या काळात २२ मार्च २०२० ते ३१ आॅगस्ट २०२१ या दीड वर्षांहून अधिक काळात रुग्ण व अत्याआवश्यक सेवेतील कर्मचारी अशा १४ लाख ४० हजार भोजन थाळ्यांद्वारे विनामूल्यपणे चांगल्या दर्जाची भोजनसेवा अखंडपणे देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता सुरुवातील ६ रुग्णवाहिकांची सोय व टप्प्याटप्याने १० रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली.

जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून मध्य पुण्यातील २७२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन कामाला प्रारंभ केला. पुणेकरांचे सहकार्य मिळविण्यासाठी तसेच पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग व होम आयसोलेशनसाठी पुणे मनपा प्रशासनाला सहाय्य करण्याकरीता मंडळांनी पुढाकार घेतला. याकरीता ट्रस्टने पुढाकार घेतला होता. याशिवाय श्रीवत्स संस्था, पुण्यातील विविध झोपडपट्टीचा परिसर, ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना मदत देण्यात आली.

Leave a Reply