Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमी वर केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन


पुणे: गेल्या 2-3 वर्षांपासून मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सातत्याने केली आहे.विविध पक्ष,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सातत्याने महागाईविरुद्ध आंदोलन केले. तरी केंद्र सरकारने महागाई कमी केली नाही. थोड्याच दिवसावर दिवाळी सण आला आहे तरी केंद्र सरकारने महागाई कमी केली नाही. म्हणून आज काँग्रेसने सेव्हन लव्हज चौक, शंकरशेठ रोड येथे महागाई विरोधात आंदोलन केले.


या  आंदोलनाच्या वेळी दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने वाढवलेल्या  महागाईचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक आबा बागुल, माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, रमेश अय्यर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, योगेश भोकरे,बबलू कोळी,  ऋषिकेश वीरकर, कुणाल काळे, अक्षय नवगिरे, परवेज तांबोळी, धनराज माने, निलेश सांगळे, ओमकार मोरे, सागर सासवडे, कुलदीप यादव यांच्यासह काँग्रेसचे पुणे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले, गेली दोन-तीन वर्षे झाले मोदी सरकारने महागाई वाढवली आहे. दिवाळी सण हा तोंडावर आला आहे तरी केंद्र सरकार महागाई कमी करत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर हे वाढत आहेत पेट्रोल शंभरी पार  जेंले आहे. गॅस मधून केंद्र सरकार ला  सबसिडी भेटत आहे. केंद्र सरकार महागाई कमी करण्याची गरज आहे.  म्हणून आज आम्ही महागाईच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पंतप्रधान मोदींनी लादलेले ३ काळे कायदे कृषी क्षेत्र उध्वस्त करत आहेत. या काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले जात आहे, दहशतवादी ठरवले जात आहे.

संजय बालगुडे म्हणाले,पंतप्रधान मोदींनी लादलेले ३ काळे कायदे कृषी क्षेत्र उध्वस्त करत आहेत. या काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले जात आहे, दहशतवादी ठरवले जात आहे.म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

रमेश बागवे म्हणाले, मोदी सरकारने महागाई ही वाढवली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेस चा यंदा महानगरपालिका निवडणुकीत झळकणार भाजपला जनता दाखवून देईल.

Leave a Reply