बँक ऑफ इंडियाच्या वाहन, गृहकर्ज व्याजदरांमध्ये कपात
मुंबई :फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून बँक ऑफ इंडिया या आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँकेने गृहकर्ज व्याजदरांमध्ये ३५ बेसिस पॉइण्ट कपातीची, तर वाहन कर्ज व्याजदरांमध्ये ५० बेसिस पॉइण्ट्स कपातीची घोषणा केली आहे. ज्यामुळे गृहकर्जांसाठी किमान व्याजदर ६.८५ टक्क्यांवरून ६.५० टक्क्यांपर्यंत, तर वाहन कर्जांसाठी व्याजदर ७.३५ टक्क्यांवरून ६.८५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
१८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणारे हे विशेष व्याजदर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असतील. हे विशेष व्याजदर नवीन कर्जे घेणा-या, तसेच कर्ज हस्तांतरण करू इच्छिणा-या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. ३१.१२.२०२१ पर्यंत गृहकर्ज व वाहनकर्जासाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे.
