Tuesday, July 28, 2026
Latest NewsSports

दोशी करंडक – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा सलग तिसरा विजय

पुणे  : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत अॅलन रॉड्रिक्स(4-16) याने केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाचा डाव 26.4षटकात सर्वबाद 100धावावर संपुष्टात आला. यात धीरज फटांगरेने 44 चेंडूत 7चौकार व 2षटकारासह सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 22षटकात 4बाद 104धावा करून पूर्ण केले. यात सूरज गोंड नाबाद 29, पवन शह 26, टिळक जाधव नाबाद 11यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर अॅलन रॉड्रिक्स ठरला.
येवलेवाडी येथील ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत अजित बगाडी(5-33) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स अकादमी संघाचा 97 धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन जिमखाना: 26.4षटकात सर्वबाद 100धावा(धीरज फटांगरे 47(44,7×4, 2×6), निकुंज बोबरा 22(28), स्वप्निल फुलपगार 11, अॅलन रॉड्रिक्स 4-16, राहुल वारे 3-2, मनोज यादव 2-33) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 22षटकात 4बाद 104धावा(सूरज गोंड नाबाद 29(43,6×4), पवन शहा 26(28,6×4), टिळक जाधव नाबाद 11, धीरज फटांगरे 3-38, आत्मन पोरे 1-40); सामनावीर-अॅलन रॉड्रिक्स; व्हेरॉक संघ 6गडी राखून विजयी;
ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकादमी: 35.5षटकात सर्वबाद 171धावा(मेहुल पटेल 36(53,2×4,1×6), आदर्श बोथरा 30(48,3×4,1×6), प्रज्वल घोडके 25(23), अनोश भोसले 19, रामकृष्ण घोष 3-23, कुणाल कोठावडे 1-20, सुदीप पाठक 1-29) वि.वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 19.1षटकात सर्वबाद 74 धावा(अद्वैय शिधये 21, सुदीप पाठक 21, शुभम उपाध्याय 17, अजित बगाडी 5-33, योगेश कारे 3-32); सामनावीर-अजित बगाडी; ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकादमी संघ 97 धावांनी विजयी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading