Thursday, July 30, 2026
BusinessLatest NewsPUNE

Pune – नवरात्री दरम्यान गृहखरेदी उत्साह

पुणे : मागील दीड वर्षातील विविध घडामोडींवर यशस्वीरीत्या मात करीत आता बांधकाम व्यवसाय क्षेत्र हे नव्याने उभे राहिले आहे. पुण्याच्या घर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देणा-या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राने या कोरोना काळात चांगले काम केले, त्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर देखील याचा सकारात्मक परिणाम झालेला पहायला मिळाला असल्याची भावना बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली.
विशाल गोखले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स, म्हणाले,  यंदा आमच्या नवरात्रातील गृह महोत्सवाचे सलग ९ वे वर्ष होते. उत्तम दर्जाचे बांधकाम, शहरातील मोक्याच्या ठिकाणी साकारणारे गृह प्रकल्प, वेळेत ताबा आणि नवरात्रीच्या काळात सदनिकेची नोंदणी केली तर दरात मोठी सवलत अशा वैशिट्यपूर्ण बाबींमुळे आंम्हाला नेहमीच ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी पहिल्या कोरोनाच्या लाटेच्या पार्शवभूमीवर आमच्या मनात थोडी साशंकता होती. परंतु कोरोना काळात देखील ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखवला.

यावर्षी परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा सकारात्मक परिणाम घर खरेदीवर होत आहे. यंदा आंम्ही निवासी गृहप्रकल्पांबरोबरच आमच्या कोथरूड येथील गोखले बिझनेस बे या व्यावसायिक संकुलातील जागा देखील सवलतीच्या दरात बुकिंग साठी उपलब्ध करून दिल्या होत्या त्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकंदरीत या वर्षी आंम्हाला निवासी आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम प्रतिसाद लाभला.

अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो म्हणाले, मागील काही काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमा, गृहकर्जावर ऐतिहासिकदृष्ट्या कमी असलेला व्याजदर, महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात मिळत असलेली सवलत, सध्याच्या सण व उत्सवाच्या काळात बांधकाम व्यावसायिकांकडून मिळत असलेली भरघोस सवलत यांसारख्या बाबी गृह खरेदीदारासाठी उपयुक्त ठरल्या.

याबरोबरच स्वत:चे घर असण्याचे फायदे याच काळात नागरीकांना प्रकर्षाने जाणवले. ज्यांच्याकडे घर आहे अशांना मोठ्या घरात जाण्याचे वेध लागले. सर्वच बाजूने बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

सध्याचा सिझनमध्ये आमच्या सदस्यांनी गृहखरेदीदारांमध्ये असलेला उत्साह अनुभवला आहे. नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रो व सीआरई मॅट्रीक्स यांच्या वतीने बांधकाम व्यवसायाची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात घरांच्या खरेदीमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये ८% तर घरांच्या विक्रीमूल्यामध्ये २७% इतकी वाढ झाल्याचे दिसून आले, हे त्याचेच द्योतक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading