Friday, September 25, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून उंड्री वडाचीवाडी ते पुलगेट नवीन बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १७६ उंड्री वडाचीवाडी ते म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांच्या हस्ते उंड्री येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांनी या बसेवेसाठी पाठपुरावा केला. याप्रसंगी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे, राजेंद्र भिंताडे, जयश्री पुणेकर, अश्विन खिलारे, दादासाहेब कड, ओंकार होले, विठ्ठल भिंताडे, बाकी काय सचिन हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक १७६ – उंड्री वडाचीवाडी ते म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) या बस सेवेचा मार्ग वडाचीवाडी, उंड्री गाव, वसंत अपार्टमेंट, एनआयबीएम दोराबजी मॉल, लुल्ला नगर, कमांड हॉस्पिटल, म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) असा असणार आहे. सध्या या बसमार्गावर एका बसद्वारे दर तासाला बस सेवा उपलब्ध असेल. 

यावेळी श्रीनाथ भिमाले म्हणाले, “पीएमपीएमएलच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये १० रुपयांत दिवसभर प्रवास व पुणे मनपा हद्दीत ४० रुपयांत दिवसभर प्रवास अशा योजना लागू करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच पीएमपीएमएल च्या ताफ्यात ई-बस व सीएनजी बस वाढविल्या जात आहेत. पीएमपीएमएलने नागरिकांची गरज ओळखून नवीन बसमार्ग सुरू केले आहेत. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता येणार आहे.

दत्तात्रय झेंडे म्हणाले,”या बससेवेमुळे उंड्री व परिसरातील प्रवासी नागरिकांना पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी पुलगेट पर्यंत जाता येईल व तिथून पुढे स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसरला जाण्यासाठी पीएमपीएमएलची पूरक बससेवा मिळेल. पीएमपीएमएलने नव्याने सुरू केलेल्या एका मनपा हद्दीसाठी ४० रू. व दोन्ही मनपा हद्दीसाठी ५० रू. व पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी ७० रू. च्या दैनिक तसेच ९००, १२०० व १४०० रूपयांच्या मासिक पासेसचा लाभ घ्यावा.” मा. डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अश्विन खिलारे यांनी आभार मानले. पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार करून सदर बस सेवा सुरु केल्याबद्दल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading