Thursday, July 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शेतात वजन काटा नसल्यास जी परिस्थिती उद्भवेल त्यास शासन जबाबदार राहील – अतुल खूपसे पाटील

पुणे:ऊस वाहतूकदारांच्या शासकिय कमेटीवर वाहन मालकांची नेमणूक करावी, जास्त ऊस भरून आल्यानंतर वाहन मालकाचे वाहतूक आणि तोडणी कट केली जाते आणि ते कारखान्याकडे वर्ग केली जाते .जर ऊसाच्या शेतात वजन काटा नसेल तर त्याला त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल व त्याचे नुकसान होईल त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी आज साखर आयुक्तांची बैठक झाली त्यांनंतर  दिला .


अतुल खूपसे म्हणाले,कारखानदारांकडून ऊस वाहतूकदारांची नेहमीच अडवणूक सुरू आहे. डिझेलचे दर, ड्रायव्हरच्या पगारी व वाहनांच्या स्पेअर पार्ट च्या किमती दुपटीने वाढल्या. मात्र वाहतुकीच्या दरामध्ये कारखानदारांनी कोणतीच वाढ केली नाही. शिवाय करार करून, कर्ज उचलून कारखानदारांकडून ऊस वाहतूक दारांवर व वाहन मालकांवर नेहमीच अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. याबाबत जनशक्ती संघटनेने आवाज उठविला आणि यासाठी पंढरपूर येथे न भूतो न भविष्यती ट्रॅक्टर आंदोलन केले. असे अतुल खूपसे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading