पुनवर्सन शेरे घोटाळाचा जो पर्यत तपास पूर्ण होत नाही तो पर्यत विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा-धमेंद्र खाडरे

पुणे: मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कुपा आशिवादाने पुनवर्सन संपादित जमीनीवरील इतर अधिकारात असलेले पुनवर्सनाचे शेरे कमी करण्याकरिता राज्यातील पुनवर्सन अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आढेशाचे पुनवर्सन कमी करत शेतकरी बाधंवाकडून करोडोची माया गोळा करताना दिसत आहे. 5
ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पुनवर्सनाचे शेरे घोटाळ्याचे  मुख्य सूत्रधार वडेट्टीवार असल्याची शक्यता आहे. . पुनवर्सन घोटाळा तपासामध्ये अडथळा येवू शकतो .त्यामुळे जो पर्यत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा .अशी मागणी पत्रकार परिषदेत धमेंद्र खांडरे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस भाजपा यांनी केली.

या पत्रकार परिषदेला प्रदीप कंद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे ,संदीप भोंडवे अध्यक्ष शेतकरी कृती समिती उपस्थित होते.

खांडरे म्हणाले, मौजे वाडेबोलाइ तालुका हवेली येथील 57 एकर 27 गुंठे क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याबाबत आर्थिक तडजोड करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या विभागीय उपायुक्त पुनर्वसन सुधीर जोशी यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, सुधीर जोशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर भ्रष्टाचारात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत चौकशी करण्यात यावी, सदर घटनेची जबाबदारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुनर्वसन अधिकारी कोणतीही शासकीय मान्यता न घेता जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवून अशा प्रकारे किती जमिनीवरील पुनर्वसनाचे शहरे कमी केले गेले याची चौकशी करण्यात यावी, हवेली दौंड व खेड तालुक्यातील पुनर्वसन क्षेत्रावरील शेरे काढण्यासंदर्भात शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दाखल केल्या प्रस्ताव लवकरात लवकर मिळवून क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शेरे तात्काळ कमी करण्यात यावे.

Leave a Reply

%d bloggers like this: