अभाविप च्या वतीने स प महाविद्यालय येथे सदस्यता अभियान उत्साहाने सुरू

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७४वर्षा पासुन शैक्षणिक व सामजिक क्षै‌‌त्रात अविरत पणे कार्य करत आहे, आखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे .अशा या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अभाविप चे सदस्यता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, सर्व विद्यार्थ्यांनी अभाविप ची सदस्यता करावी असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य पुणे भाग संयोजक क्षुधांत पाटील ह्यांनी केले.

आज चा विद्यार्थी आजचा नागरिक असून उद्याचे भविष्य आहे व हाच विद्यार्थी आज कूठे तरी भरकटलेल्या वाटेवर चालला आहे. त्या करिता विद्यार्थी परिषद अविरत पणे काम करून विद्यार्थ्याना चांगले विचार, चांगले मार्गदर्शन करण्याचे काम करून एक चांगला नागरिक बनवायचे काम विद्यार्थी परिषद करत आहे. ह्या वेळी मध्य पुणे जिल्हा संयोजक क्षुधांत पाटील मध्य पुणे नगर मंत्री तन्मय ओझा , सह मंत्री मंदार लडकत ,प्रतीक्षा सरवदे, ऋतिक शिंदे ,अमर जाधव ,शुभम कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश सह कार्यालय मंत्री दिनेश जोशी सुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: