Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

म. न. पा सुरक्षा रक्षकांचे आंदोलन

पुणे :  मनपा मधे कंत्राटदारांमार्फत नेमणूक करण्यात आलेल्या  सुरक्षारक्षकांचे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सुरक्षा रक्षकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या आंदोलनाला माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर , पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस संजय बालगुडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप,, काँग्रेस गटनेते आंबा बागूल, नगरसेवक दिपकभाऊ मानकर , युवराज बेंद्रे, पुणे शहर मनसे अध्यक्ष वसंत मोरे, यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.या आंदोलनात सुरक्षा रक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली.महाराष्ट् प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ऍड.अभय छाजेड, काँग्रेस गटनेते आंबा बागूल  आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांनी मनपा आयुक्त   विक्रमकुमार यांना निवेदन दिले, त्यावेळी आयुक्तांनी तीन महिन्यांचे वेतन करण्याचा आदेश दिला. कोणत्याही सुरक्षा रक्षकाला कामावरून काढण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. व उर्वरित प्रश्नांबाबत  अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांचेकडे संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश दिला . जर या सुरक्षारक्षकांचे प्रश्न सुटले नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री. प्रशांत जगताप यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading