fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

एमजी मोटर इंडियाने ९.७८ लाख रु. च्या प्रारंभिक किंमतीत ‘अॅस्टर’ लॉन्च केली

मुंबई : एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर ९.७८ रु. च्या खास प्रारंभिक किंमतीत लॉन्च केली आहे.

एमजी अॅस्टर एका स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये येते, ज्याच्यात तीन वर्षे/अमर्याद किलोमीटर्स, तीन वर्ष रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर फ्री पिरीयॉडिक सर्व्हिस सामील आहेत. अनोख्या माय एमजी शील्ड प्रोग्रामसह अॅस्टर ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लानसह आपले ओनारशिप पॅकेज निवडण्याची आणि पर्सनलाईझ करण्याची मुभा मिळते. अॅस्टरचा ओनरशिप खर्च ४७ पैसे प्रती किलोमीटर आहे, ज्याची गणना एक लाख किमी. पर्यंत करण्यात येते. या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच अॅस्टरमध्ये ३-६० प्रोग्राम आहे. हा एक अशुअर्ड बाय बॅक प्लान आहे, ज्याच्या अंतर्गत खरेदीनंतर तीन वर्षांनी ग्राहकांना अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के मिळू शकतात. हा प्रोग्राम लागू करण्यासाठी एमजी इंडियाने कारदेखोशी भागीदारी केली आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, “अॅस्टर ही गाडी एमजी ब्रॅंडचा स्थापित वारसा पुढे नेत भविष्यातील मोबिलिटीस सम्मोहक बनवते आणि सोबत त्यात व्यक्तिमत्व, व्यावहारिकता आणि टेक्नॉलॉजी आणते. अनेक फीचर्सनी समृद्ध आणि या सेग्मेंटमध्ये आधी न दिसलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज ही एसयूव्ही या सेग्मेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल. या कारचे स्थान उत्तम आहे आणि किंमत देखील आकर्षक आहे. माय एमजी शील्ड ग्राहकांना संपूर्ण मनःशांती प्रदान करते आणि प्रत्येक वेळी रोमांचक अनुभव देण्याच्या आमच्या तत्वज्ञानास ते अनुरूप आहे.”

एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या ग्लोबल डिझाइन फिलॉसॉफीअनुसार अॅस्टरचे स्टायलिंग करण्यात आले आहे. स्मार्ट आणि शार्प व्हेरियन्टसाठी अॅस्टरच्या आय-स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ऑटोनॉमस लेव्हल २ फीचर्सवाल्या एडीएएस २२० टर्बो एटीमध्ये पर्यायी पॅकच्या बरोबर शार्प व्हेरियन्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.

ग्राहक आजपासून एमजीच्या विस्तृत नेटवर्क किंवा वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन अॅस्टरची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात आणि प्री-रिझर्व करू शकतात. बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू होईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading