fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

वातानुकूलित मेट्रोमधून प्रवास करून पुणेकराना खरेदीचा आणि नाटक-सिनेमाचा आनंद घेता येणार

पुणे: आता सर्वांनाच ऑटोमोड हा शब्द परिचयाचा झाला आहे. पुणे मेट्रो ऑटोमोड असणार आहे. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार आहे. या मार्गांचे नियंत्रण मेट्रोचे टर्मिनल असलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन स्थानकावर असणार आहे. मेट्रोच्या आतील व मेट्रोच्या स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथून मेट्रोवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे चालकाची आवश्‍यकता नसणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून ती विनाचालक धावणार आहे. मात्र, सुरवातीला मेट्रो विना चालक धावली तर काही प्रवाशी घाबरून त्यात बसणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना सवय झाल्यानंतरच मेट्रो विना चालक धावणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

पुणे मेट्रोमार्ग तयार झाल्यानंतर मेट्रो अवघ्या ६० सेकंदात प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर खरेदी, बालगंधर्वला नाटक, आयनॉक्स किंवा ई-स्क्वेअरला सिनेमा असो की दगडूशेठ गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोटार किंवा दुचाकी लावण्यासाठी वाहनतळ शोधण्याची गरज पडणार नाही. वातानुकूलित मेट्रोमधून प्रवास करून खरेदीचा आणि नाटक-सिनेमाचा आनंद घेता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading