Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

गर्भपात केल्याच्या आरोपांवर अभिनेत्री समंथा काय म्हणाली?

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री सामंथा प्रभू बद्दल  प्रचंड चर्चा झाली.  त्यांचे चाहते देखील या बातमीमुळे निराश झाले होते. घटस्फोट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समंथाने सोशल मिडीयावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

घटस्फोट काळात समंथाविषयी अनेक अफवादेखील पसरल्या होत्या. इतकंच नाही तर तिच्यावर आरोप देखील करण्यात आले होते. त्यावरच आता समंथा व्यक्त झाली आहे. घटस्फोट घेतल्यानंतर समंथावर अनेक आरोप नेटकऱ्यांकडून लागवण्यात आले.  इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत परसवलेल्या अफवांवर तिने उत्तर दिल आहे.

पोस्ट मध्ये  समंथा म्हणाली, माझ्या कठीण काळात तुम्ही मला जो भावनिक आधार दिला. तो पाहून मी खरंच खूप भारावून गेले आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूती, काळजी आणि अफवांपासून माझं संरक्षण केल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. ते सांगतात, माझं अफेअर होतं. मला मूल नको होतं. मी संधीसाधू आणि आणि आता तर मी गर्भपात केला अशी अफवा पसरली आहे. पण, घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण, तुम्हाला मी एक वचन देते, ज्या गोष्टी घडतायेत त्यामुळे आणि ते जे काही बोलतील त्या सगळ्यामुळे मी खचून जाणार नाही’, अशा आशयाची पोस्ट शेअर करत तिने कठीण काळात धीर देणाऱ्यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading