Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे भत्ते व थकबाकी दिवाळीपूर्वी द्या – मुकेश तिगोटे

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर देय ऑक्टोबर महिन्याचे वेतन १० ऑक्टोबर पर्यंत तर माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात परिवहन राज्यमंत्री .सतेज  पाटील तसेच शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच वेतन व थकबाकी अदा करण्यासंदर्भात आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केल्याचे सांगितले.

रा. प. कर्मचा-यांना दिपावलीचा सण साजरा करण्यासाठी माहे सप्टेंबर देय ऑक्टोबर या महिन्याचे वेतन १० ऑक्टोबर पुर्वी तर माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दि.१ नोव्हेंबर,२०२१ रोजी दिवाळीपुर्वी अदा करण्यात यावे तसेच एकतर्फी वेतनवाढ लागू करताना दि. १ एप्रिल, २०१६ पासून शासनप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर ३%, घरभाडे भत्ता ८, १६, २४ % देण्याचे मान्य केले होते परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे शासनाप्रमाणे भत्ते देऊन थकबाकीची रक्कम एक रकमी दिपावलीपुर्वी देण्यात यावी अशी आग्रही करण्यात आली. तसेच सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करावी अशी लेखी मागणी करण्यात आली.

यावेळी मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी शासनाकडील मानव विकास बसचे नियोजन खात्यामार्फत २३१ कोटी रुपये थकबाकी एसटी महामंडळास लवकरच वर्ग होतील त्यानंतर पुढील आठवड्यात वेतन अदा करण्यात येईल तर इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर चर्चा करुन यातून मार्ग काढण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, इंटक मिडिया टिम प्रमुख इस्माईल पठाण, संचालक पदाचे उमेदवार तथा राज्यस्तरीय पदाधिकारी शिवचंद्र पत्रकर, सुरेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading