Tuesday, July 28, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्या पुण्यासह मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे:काल संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तासभर पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शहरातील अनेक ठिकाणांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहत असल्याने अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. यानंतर उद्याही पुण्यासह मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता उद्या राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

गुजरात, राजस्थाननंतर उत्तरेतील काही राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. असं असलं तर राज्यात मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रकोप सुरू आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्यानं उद्या पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, आणि नांदेड या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading