Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात रंगला राणे – ठाकरे यांच्यात ‘सामना’

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घानामुळे कोकणासाठी आजचा दिवस आनंदाचा. मात्र याच विमानतळाच्या उद्घाटन व्यासपीठावर केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सामना’ रंगलेला दिसला. ज्यांनी आंदोलन केली तेच आज उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित आहेत, असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. तर कोकणाला कॅलिफोर्निया करू म्हणणारे अनेकजण आले पण तरीही विमानतळ व्हायला इतकी वर्ष लागली असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हर्चूली उपस्थितीत होते. तर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन अनिल परब,खासदार  विनायक राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल जाहीर केल्या प्रमाणे ‘हप्ते’ वसूल करणाऱ्यांची नावे मुख्यमंत्र्याना सांगितली नसली तरी राणे यांनी लोकप्रतिनिधी काय काम करतात यांची माहिती घ्या, नाहीतर एखादा प्रतिनिधी नेमा असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. पुढे ते म्हणाले, आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. या विमानताळामुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे. पाण विमानतळावरून खाली उतरल्यावर काय पहायच? एमआयडीसीने रास्ते, पाणी यांची सोय करायला हवी. मी मागे जेव्हा विमानतळाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हा ज्यांनी विरोध करीत आंदोलन केली तेच आज उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित आहेत. आदित्य आज पर्यावरण मंत्री आहे. माझ्यासाठी तो टॅक्स फ्री आहे. फक्त त्यांनी पदाला साजेस काम करून दाखवावे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले,  शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर विश्वातील शौर्याचे प्रतीक होते.  एकीकडे पेशवे  आणि दुसरीकडे शिंदे , होळकर, गायकवाड यांनी कोकणाला स्वातंत्र्य दिले होते.  सिंधुदुर्गाची धरती ही केसरीया धरती आहे. आजपासून तिथे नवीन अध्याय सुरू झाला आहे. गेल्या तीन दशकांपासूनची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. माझ्या वडिलांचा ही अपेक्षा होती.  कोकणातील किल्ले जालदुर्ग यांची दीमाखता, इतिहास, कला आम्हाला जगाला दाखवायची आहे.   पाच वर्षात 20 ते 25 विमान उदाणे आम्हाला या विमानतळावर पाहीजेत पाहिजेत , एकत्र मिळून काम केल तर असंभव ते संभव होईल  असा विश्वा त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नसून आनंद व्यक्त करण्याचा आहे.  शिवसेना आणि कोकण यांचे नाते अतूट आहे. कोकणाचे वैभव आपण आज जगासमोर नेत आहोत.  विमानतळाचे श्रेय घेऊ पहाणाऱ्यांनी विमानतळासाठी इतके दिवस का लागले? हे सांगावे. कोकणाचे केलिफोर्निया करणार, असे अनेकवेळा अनेकजण बोलून गेले, पाठांतर करून बोलण  वेगळ आणि तळमळीने बोलण वेगळ ,माळमळीने बोलण वेगळ आणि आत्मसात करून बोलण वेगळ असे म्हणत ठाकरे यांनी राणे यांना टोला लगावला. तसेच उद्या सिंधुदुर्ग किल्ला मीच बांधला असा दावा कुणी करू नये असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading