Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अभाविप गडचिरोलीच्या वतीने सदस्यता अभियान उत्साहाने सुरू

गडचिरोली :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७३ वर्षा पासुन शैक्षणिक व सामजिक क्षै‌‌त्रात अविरात पणे कार्य करते आहे, आखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे .अशा या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्यता अभियान संपूर्ण भारतात सुरू आहे आणि सर्व गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी अभाविप ची सदस्यता करावी असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री अभिषेक देवर यांनी केले.

आज चा विद्यार्थी हाच उद्या चे भविष्य आहे व हाच विद्यार्थी आज कूठे तरी भरकटून राहला आहे. त्या करिता विद्यार्थी परिषद हे अविरत पणे काम करून आपल्या विद्यार्थ्याना चांगले विचार, मार्गदर्शन देण्याचे काम करून एक चांगला नागरिक बनवायचे काम विद्यार्थी परिषद करत आहे.या सदस्यता अभियान मध्ये जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर ,जिल्हा सह संयोजक यश गण्यारपवार ,जिल्हा सदस्यता प्रमुख अक्षय कोकोडे ,जयेश ठाकरे,तुषार चुधरी ,हिरालाल नुरुती,अनिल पोट्रेट,अनघा संदुकवार,टीना बनसोड ,कार्तिक पावलबुद्धे ,विभाग संघटन मंत्री शक्ती केराम आदी कार्यकर्ते सदस्यता अभियान राबवित आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading