Wednesday, August 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्याही उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे: राज्यात मागील काही काळापासून जोरदार पाऊस होत आहे. उद्याही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर , पुणे आणि विदर्भातील काही भागात तीव्र पावसाचे ढग दिसत असून उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासहीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

त्याचबरोबर या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. परवा पासूनमात्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading