Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

भारतात डिजिटल सेंटर उभारण्यासाठी ट्वाइनिंग्स ॲन्ड ओव्हलटीनची निहिलंट सोबत भागीदारी

पुणे : ट्वाइनिंग्सओव्हो या स्पेशॅलिटी टी, ग्रीन टी आणि अन्य घटकांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी ने निहिलंट या जागतिक स्तरावरील कन्सल्टिंग आणि बदल व्यवस्थापन तसेच मानव केंद्रित समस्या सोडवण्यात आघाडीवर असलेल्या कंपनी बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली.  निहिलंट कडून भारतात ट्वाइनिंग्स डिजिटल सेंटर सुरू करण्यात सहकार्य करण्यात येणार असून त्याच बरोबर ट्वाइनिंग्सच्या डिजिटल क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध  करून दिल्या जाणार आहेत. ‍

या केंद्रामुळे ट्वाइनिंग्सओव्हो ला त्यांची डिजिटल क्षमता वाढवण्याबरोबरच त्यांची व्यावसायिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी विकास  करणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर अतिशय कौशल्याने युक्त अशा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध लोकांमुळे ट्वाइनिंग्सओव्हो वेगाने आपले  व्यावसायिक तंत्रज्ञान वाढवून ते व्यवसायाची जागतिक स्तरावरील वाढती मागणी पूर्ण  करू शकेल.

आपला विचार व्यक्त  करतांना ट्वाइनिंग्स चे सीएफओ पीटर टेलर यांनी सांगितले  “ आंम्हाला एक जागतिक स्तरावरील आयटी संस्था बनायचे आहे ज्यामुळे आम्ही योग्य तंत्रज्ञानाची मानसिकता, कौशल्ये आणि क्षमता निर्माण करू शकू. आमचा असा विश्वास आहे की आमच्या ‘डिजिटल सेंटर’ मुळे आमच्या व्यवसायाचे दिर्घकालीन लक्ष्य पूर्ण होऊ शकेल आणि आम्ही सातत्यपूर्ण असे तंत्रज्ञानावर आधारीत व्यावसायिक कार्य  करू शकू. निहिलंट हा आमच्यासाठी सुयोग्य असा  भागीदार ठरला कारण त्यांच्याकडे दीर्घकालीन  अनुभव, मोठी तंत्रज्ञान क्षमता आणि चांगली सांस्कृतिक बैठक आहे.”

या प्रगती विषयी माहिती देतांना ट्वाइनिंग्स चे सीआयओ संदीप सीरीपत यांनी सांगितले “ आंम्हाला आमच्या तंत्रज्ञानातील योजनांना गती द्यायची ‍ असून आमच्या सर्व घटकांना वॉव  अनुभव द्यायचा आहे.  निहिलंट च्या सहकार्याने  डिजिटल सेंटरच्या सुरूवाती चा उपयोग आंम्हाला साईनबोर्ड सारखा होणार असून यामुळे तंत्रज्ञानावर आधारीत अशा व्यावसायिक कार्यक्षमतेने युक्त असा पुढील स्तरावरील व्यवसाय होऊ शकेल.”

केंद्राच्या सुरूवाती विषयी बोलतांना निहिलंटचे संचालक आणि कार्यकारी व्हाईस चेअरमन एलसी सिंग यांनी सांगितले “ट्वाइनिंग्सओव्हो बरोबरची निहिलंटची भागीदारी झाल्याने त्यांच्या डिजिटल बदलाशी संबंधित उपक्रमांना गती प्राप्त होऊन सुयोग्य, सक्षम आणि सर्वोत्कृष्ट डिजिटल क्षमता प्राप्त होतील. निहिलंट ला ट्वाइनिंग्सओव्होच्या लक्ष्याची जाण आहे आणि त्यांनी एक एंगेजमेंट मॉडेल समोर ठेवले आहे ज्यायोगे भविष्यात सुयोग्य, विश्वसनीय आणि सुरक्षित सेवा देणे शक्य होईल.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading