नवरात्री निमित्त भाजपच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा
पुणे : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस वडगाव शेरी प्रभागातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम भाजपाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा या अभियाना अतंर्गत सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा या अभियानाच्या अंतर्गत सफाई कामगार, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, घरेलू कामगार, डॉक्टर, वकिल, शिक्षिका, भजनी मंडळ, छोटे व्यवसायिक, भाजी विक्रेते, उच्च शिक्षित अशा विविध क्षैत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत आज चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक,नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड, नगरसेविका शितल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव,शशी बोडके, राजू घुले, महेंद्र चांधेरे, सागर काळे, विपुल राऊत, योगेश शिंदे, विष्णू चांधारे, मुकूंद गलांडे, संतोष घोलप, लक्ष्मण तिप्पे, गणेश वाईकर,विष्णू सुरणर, व महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमा बाबत नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले की, प्रभागातील ज्या महिला स्वकतृत्वावर मोठया पदावर गेल्या आहेत.अनेक कुटुबांच्या कर्त्या महिला आहेत. घर आणि व्यवसाय संभाळत आहे. अशा ४०० कर्तुत्वान महिलांचा सन्मान नवरात्री निमित्त करत आहे.
