‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे दिमाखात उदघाटन
पुणे : शहरातील लोकप्रिय अशा पुणे लोकमान्य फेस्टिव्हलची देवीची प्राणप्रतिष्ठापना श्री व सौ नरेश मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उदघाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून व आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून उद्योजक नरेश मित्तल, शुभांगी सातपुते आणि महिलांद्वारे तसेच लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ऍड. गणेश सातपुते यांचे हस्ते सुरवात करण्यात आली.
पुढील दहा दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डिजिटल माध्यमाद्वारे पुणेकरांसाठी करण्यात आले आहे. पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे २४ वर्ष असून या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुण – तरुणींना कलेचे व्यासपीठ उपलब्ध करुन देताना सोलो डान्स ग्रुप डान्स , कपल दांडीया , रॅप साँग , मेंहदी , रांगोळी , नेल आर्ट , हेअर स्टाईल या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले असून महाराष्ट्रातील शक्तीपीठे , पुणे जिल्ह्यातील देवींचे दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे , याच कार्यक्रमात डॉ . मंजिरी भालेराव , योगश प्रभुदेसाई , विनीती देशपांडे , प्रिया फुलंब्रीकर , प्रणव गोखले , सौरभ मराठे इ.ची विविध विषयांवर दररोज व्याख्याने होणार आहेत . लाईव्ह होम मिनिस्टर हा संपूर्ण कुटुंबीयांकरीता गेम्स शो होणार आहे . या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या गेम्स क्वीन चैताली माजगावकर – भंडारी या असणार आहेत . या कार्यक्रमांचे प्रक्षेपण पुढील संकेत स्थळावर होणार आहे .
www.punelokmanyafestival.com , fpunelokmanyafestival , Opunelokmanyafestival2020 , punelokmanyafestival2020 , सोशल मिडीयावर या लिंक व्दारे हे सर्व कार्यक्रम पहाता येतील व स्पर्धकांनीही Whats app No. 7897893454 या क्रमांकावर आपले व्हिडीओ पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी ९९७०७५६६०६ ,
९०७५५५१५३० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अॅड . गणेश सातपुते यांनी केले आहे.
