Wednesday, April 8, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण – आर्यन खानचा जामीन कोर्टाने फेटाळला

मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना काल न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांच्या जामीनासाठी कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र किल्ला कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीनासाठी आता सत्र न्यायालयात अर्ज कारावा लागणार आहे. त्यामुळे आजची रात्रही आर्यन खानला जेलमध्येच घालवावी लागणार आहे.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केले होते. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली.

आज आर्यन खानला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच तासांच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आता या निकालानंतर आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading