पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 125 रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 125नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 155रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 22हजार 26इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 91हजार 627इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9049 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1550रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 187रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8525
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
