संतापजनक – सहा वर्षाच्या चिमुकलीवर डिलिव्हरी बॉय कडून अत्याचार
मुंबई : येथील महिला अत्याचाराच्या घटना संपता संपण्याचे नाव घेत नाहीयेत. आज अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका डिलिव्हरी बॉयने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपी डिलिव्हरी बॉयच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी करण्यासाठी एका इमारतीजवळ गेला होता. तिथे त्याला ही 6 वर्षांची चिमुकली एकटी उभी दिसली. डिलिव्हरी बॉय तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घेवून गेला व तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. घटेननंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चारकोप पोलिस करीत आहेत.
