Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा : जात पंचायतीने महिलेला नग्न करत केली मारहाण

उस्मानाबाद : साडेतीन शक्तीपिठा पैकी एक शक्तीपीठ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातच स्त्री शक्तीचा जागर केल्या जाणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस  आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे.  उस्मानाबाद येथील काका नगर भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याला जातपंचायती कडून ही अमानुष वागणूक दिली गेली.  गेल्या आठ वर्षांपासून जातपंचायतीकडून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून संबंधित दाम्पत्यानं विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ आणि सुनिता असे पीडित दाम्पत्यांची नावे आहेत. आठ वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पीडित दाम्पत्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण जात पंचायतीकडे गेले असता, जात पंचायतीतील पंचांनी नुकसान भरपाई म्हणून चार एकर शेती आणि 7 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यामुळे पंचायतीतील लोक पीडित दाम्पत्याला सतत त्रास देत होते. मागील महिन्यात 18 सप्टेंबरला पुन्हा जात पंचायत भरवण्यात आली होती. यावेळी सोमनाथ याच्यावर त्यांच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. याची शिक्षा म्हणून आरोपींनी सोमनाथ यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडली. तर सुनिता यांना नग्न करून जबरी मारहाण करण्यात आली. समाजासमोर झालेला हा अपमान जिव्हारी लागल्यानं पीडित दाम्पत्य सोमनाथ आणि सुनिता यांनी 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान सोमनाथ यांचा मृत्यू झाला असून सुनिता या बाचावल्या आहेत.

पतीच्या मृत्यू नंतर पोलिसांनी सुनीता यांच्याकडे चौकशी केली असटा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading